Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गणेश पूजेत वापरत असलेल्या वस्तूंचे महत्तव

गणेश पूजेत वापरत असलेल्या वस्तूंचे महत्तव
, शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020 (20:02 IST)
दुर्वा
गणेश पूजनात दुर्वा विशेष महत्त्वाच्या आहेत. दू + अवम्‌ दू म्हणजे दूर असलेले व अवम्‌ म्हणजे जवळ आणते ते दूर असलेले गणेश पवित्रकांना जवळ आणतात. 
 
या प्रकारे अर्पित कराव्या दुर्वा 
दुर्वा कोवळ्या असाव्यात.
दुर्वाना ३, ५, ७ अशा विषम संख्यांच्या पात्या असाव्यात.
चेहरा सोडून सर्व गणपती दुर्वानी मढवावे. 
दुर्वाचा वास महत्त्वाचा आहे म्हणून दुर्वा दिवसातून दोन ते तीन वेळा बदलाव्या.
 
शमी पत्री
शमीमध्ये अग्नीचा वास आहे. पांडवांनी आपली शस्त्रे तेजस्वी राहावी म्हणून शमीवृक्षाच्या ढोलीत ठेवली. शमीत अनेक देवतांचा वास असल्याचे मानले गेले आहे. शमी अर्पित केल्याने वास्तू दोष देखील दूर होतात.
 
मंदाराची पत्री
मंदराची फळे पांढरी असतात औषधात पारा जसे रसायन तसे मंदार हे वानस्पत्य रसायन आहे.
 
लाल वस्तू
गणपती वर्ण लाल. म्हणून लाल फुलं, तांबडे वस्त्र, रक्‍तचंदन वापरतात. लाल रंग वातावरणातील पवित्रके मूर्तीकडे जास्त आकृष्ट होतात. मूर्ती जागृत व्हावयास मदत होते. गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले अर्पण करावे. 
 
मोदक
२१ दुर्वाप्रमाणे २१ मोदकांचा नैवेद्य दाखवतात. मोदक म्हणजे आनंद. आनंदप्रदान करणारी शक्‍ती. मोदक ज्ञानाचे प्रतीक आहे. मोदकाच्या टोकाप्रमाणे आपले ज्ञानसुद्धा थोडे आहे असे वाटते पण अभ्यास करू लागल्यावर समजते की खूप मोठे आहे. मोदक गोड तसाच ज्ञानाचा आनंदही गोड असतो. हातात मोदक म्हणजे आनंद प्राप्त करण्याची शक्ती. म्हणून याला ज्ञानमोदक देखील म्हणतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उकडीचे मोदक (स्टेप बाय स्टेप)