Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गणेश मंत्र अर्थासकट

ganesha
गणेश मंत्र
वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्य समप्रभ।
निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा।।
 
वक्रतुंड अर्थात वाकडी सोंड असलेले, विशाल शरीर असलेले, लाखो सूर्यासारखे तेजस्वी असलेले हे भगवान श्री गणेशा, माझ्यावर कृपादृष्टी ठेवा म्हणजे माझी सर्व कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील. 
 
शुभ भगवान गणेश हा भगवान शिव आणि माता पार्वतीचा पुत्र आहे. ते बुद्धिमत्ता आणि विवेकाचे प्रतीक मानले जातात. रिद्धी आणि सिद्धी या त्याच्या पत्नी आहेत, रिद्धीपासून लाभ आणि सिद्धीपासून शुभ म्हणजेच लाभ आणि शुभ हे त्याचे दोन पुत्र मानले जातात. प्रत्येक शुभ कार्यात श्री गणेशाची पूजा केली जाते.
 
गणेश शुभ लाभ मंत्र
ॐ श्रीं गं सौभाग्य गणपतये
वर्वर्द सर्वजन्म में वषमान्य नमः॥
 
बा्प्पांच्या या मंत्रात ॐ, श्रीं, गं बीजमंत्र आहे जे परमपिता परमात्मा, माता लक्ष्मी आणि भगवान श्री गणेशाचे बीज मंत्र आहेत. या मंत्राचा अर्थ असा आहे की, हे भगवान श्री गणेशा, आम्हाला प्रत्येक जन्मात तुझी कृपा आणि आशीर्वादप्राप्त होवोत. तुमच्या आशीर्वादाने निरोगी आणि आनंदी जीवन मिळावे. प्रभु आम्हाला चांगले भाग्य द्या आणि आमचे सर्व अडथळे दूर करा.
 
गणेश गायत्री मंत्र
ॐ एकदन्ताय विद्धमहे, वक्रतुण्डाय धीमहि,
तन्नो दन्ति प्रचोदयात्॥
 
हे गणेश गायत्री मंत्र आहे ज्यात म्हटले आहे की है आपण त्या दिव्य स्वरूप एकादंताला म्हणजेच एका दात असलेल्या भगवान श्री गणेशाला प्रार्थना करतो, जो सर्वव्यापी आहे, ज्याची सोंड हत्तीच्या सोंडेसारखी वळलेली आहे आणि सद्बुद्धीची कामना करतो. आपण भगवान श्री गणेशाला नमन करतो आणि प्रार्थना करतो की त्याच्या आशीर्वादाने तो आपल्या मनातील अज्ञानाचा अंधार दूर करून आपल्याला ज्ञानाने उजळून टाकेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Bhaum Pradosh Vrat : भौम प्रदोष व्रत