Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Jyeshtha Gauri जगतजननी तूच असशी महालक्ष्मी माता!!

gauri pujan
, रविवार, 4 सप्टेंबर 2022 (10:38 IST)
आवाहन मी करते, यावं प्रेमभरे,
तुमच्याचं कृपेने  नांदती सर्वच सौख्यभरे,
राहावं घरी, घ्यावे माहेरपण तूम्ही,
बसावं मखरांत, तृप्त व्हावं तुम्ही,
पुरवून घ्यावे लाड कोड येता माहेरी,
ल्यावी साडी चोळी नवीही भरजरी,
दागदागिने अंगावर घाला, माळा वेणी,
मुलाबाळां बरोबर तुमची ही आनंदपर्वणी.
तूच महामाया माय आहे ग आमुची,
सेवा तुमची घडो सदा गोष्ट आनंदाची,
 असेल तुझाच वास घरोघरी आता ,
जगतजननी तूच असशी महालक्ष्मी माता!!
..अश्विनी थत्ते

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Radha Ashtami 2022: राधाअष्टमीचा उपवास अखंड सौभाग्य आणि समृद्धी घेऊन येतो, जाणून घ्या तारीख शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धती