Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हरितालिका तृतीया व्रत, नियम जाणून घ्या, चुकुन करु नये हे 5 काम

हरितालिका तृतीया व्रत, नियम जाणून घ्या, चुकुन करु नये हे 5 काम
देशभरात महादेव आणि पार्वतीची पूजा करून स्त्रिया ह‍रतालिका व्रत करतात. याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होते या श्रद्धेसह विवाहित तर मुली योग्य वर प्राप्तीसाठी हे व्रत अगदी भक्तीभावाने करतात. म्हणूनच याचे काही खास नियम आम्ही आपल्याला सांगत आहोत ते व्रत करणार्‍यांनी जाणून घेणे आवश्यक आहे-
 
हरतालिका व्रत निर्जल करतात. कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणी ग्रहण करत नाही.
एकदा हे व्रत धरल्यावर व्रत सोडता येत नाही. दरवर्षी विधीपूर्वक व्रत करण्याचा नियम आहे.
या दिवशी घर स्वच्छ असावं. घरातील कचरा बाहेर करावा.
रात्री जागरण करुन भजन-कीर्तन करण्याचे नियम सांगण्यात आले आहे.
शास्त्रांप्रमाणे हरतालिका व्रत कुमारिका, सवाष्ण स्त्रिया आणि विधवा महिलांना देखील करण्याची आज्ञा आहे.
पूजेसाठी लाकडाच्या चौरंगावर वाळूने प्रतिमा तयार करावी.
पूजा करण्यापूर्वी कुटुंबातील वडिलधारी लोकांचा आशीर्वाद घ्यावा.
दिवसभर क्रोध, थट्टा, कोणाचाही अपमान करणे तसेच वायफळ बडबड करणे टाळावे.
 
चुकुन करुन नये हे 5 काम
 
क्रोध करणे टाळावे
हरतालिका तृतीया व्रत दरम्यान ईर्ष्या, क्रोधापासून दूर रहावे. या दिवशी क्रोधापासून दूर राहण्यासाठी हातावर मेंदी लावण्यात येते.
 
अपमान करु नये
तसं तर वयस्कर लोकांचा कधीच अपमान करु नये परंतू या दिवशी चुकुन देखील वडिलधार्‍यांना अपशब्द बोलू नये. त्यांचे मन दुखावेल असे शब्द तोंडातून बाहेर काढू नये.
 
झोपू नये
व्रत दरम्यान झोपणे योग्य नाही. दिवसा तर झोपू नाहीच परंतू रात्री देखील जागरण करावं. हे व्रत करणार्‍यांनी रात्री जागरण करुन भजन- कीर्तन करावं.
 
खाणे-पिणे टाळावे
हे व्रत निर्जल करण्याचे विधान आहे. कठोर व्रत करणारे या दिवशी पाणी देखील पित नाही. परंतू शरीराला सहन होत नसल्यास किंवा आजारी, गर्भवती स्त्रियांना आपल्या सवलतीप्रमाणे व्रत करु शकतात. तरी या दिवशी दूधाचे सेवन करणे टाळावे. तसेच अन्न घेणे देखील टाळावे. व्रत करण्याच्या एक दिवसापूर्वीपासून तामसिक भोजन टाळावे.
 
प्रेमाने वागावं
नवर्‍याच्या दिर्घायुष्यासाठी करत असलेल्या व्रत दरम्यान नवर्‍याशी भांडण, वाद करणे टाळावे. नवर्‍याशी चुकीची वागणूक ठेवल्यास व्रत पूर्ण तरी कसं होणार.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हरतालिका- आधुनिक संदर्भात