Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गणपती विसर्जन पूजा

गणपती विसर्जन पूजा
WD
गणपती विसर्जन पूजा करण्यासाठी कमीत कमी 20 मिनिटे लागतात. विसर्जन पूजा सुरू करण्यापूर्वी त्याचे साहित्य पूजास्थानी आणून ठेवावे.

विधी: पूजा करण्‍यापूर्वी आंघोळ करून नवीन किंवा धुतलेले कपडे परिधान करावेत. नंतर कपाळावर टिळा लावून आसनावर बसून पूजा करावी.
दिशा: पूर्वे दिशेला तोंड करून पूजा करावी.

पूजन साहित्य: पूजेच्या विविध वस्तू आपल्या हातालगत ठेवाव्यात. हात धुण्यासाठी किंवा मूर्ती पुसण्यासाठी दोन वेगवेगळे कपडे जवळ ठेवावेत. पूजेसाठी शुद्ध पाणी एका ताब्यांत भरून ठेवावे.

पूजा प्रारंभ
पूजेसाठी दिलेली प्रत्येक क्रिया वाचून तिचे अनुसरण करा. प्रत्येक क्रियेची माहिती व सूचना दिलेली आहे.
दीपक पूजन: दिव्यात तूप घालून कापसाची वात लावा. दिवा लावल्यानंतर हात धुवा. नंतर दिवा तांदुळ किंवा फुलाच्या अंथरूणावर मूर्तीच्या उजव्या बाजूला ठेवा.
(नंतर हातात फुलाच्या पाकळ्या घेऊन खालील मंत्र म्हणा.)
मंत्र: 'हे दीप देवा! आपण मला नेहमी मंगल आणि प्रसन्न ठेवा. पूजा चालू असेपर्यंत आपण शांत व स्थिर प्रज्वलित रहावे.'
(हातातील पाकळ्या दिव्याजवळ ठेवा)

खालील तीन मंत्रापैकी प्रत्येक मंत्राचा एकदा उच्चार करा. चौथा मंत्र म्हटल्यानंतर हातावरून पाणी सोडा.
1. ओम केशवाय नम: स्वाहा.... (आचमन करा)
2. ओम माधवाय नम: स्वाहा.... (आचमन करा)
3. ओम गोविंदाय नम: स्वाहा.... (आचमन करा)
4. ओम ऋषीकेशाय नम: स्वाहा....(हातावर पाणी घेऊन ताम्हनात सोडा)

webdunia
WD
पवित्रीकर
पवित्रीकरण पूजेसाठी खालील मंत्र म्हणून उजव्या हाताच्या अनामिकेजवळील सर्व बोटांनी स्वत: च्या अंगावर किंवा पूजा साहित्यावर पाणी शिंपडावे.
मंत्र: 'भगवान श्री पुंडरीकाक्षाचे नामोच्चारण केल्याने पवित्र किंवा अपव‍ित्र कोणत्याही अवस्थेत असणारा मनुष्य अंत:करणाने पावित्र्य प्राप्त करू शकतो.'
'भगवान पुंडरीक्षा मला पावित्र्य प्रदान कर.'

श्री गणेशाचे ध्यान
ध्यान मंत्र: (प्रणाम करून म्हणा) सृष्टीच्या सुरवातीच्या काळात जे प्रकट झाले ते आज जगाचे परमकारण आहे. गणपती चार भुजाधारी आहे, गजवदन असल्यामुळे त्याचे दोन्ही कान सुपासारखे आहेत, त्याला केवळ एकच दात आहे. तो लंबोदर असून त्यांचा रंग लाल आहे. त्याला लाल रंगाचे वस्त्र, चंदन आणि फुले प्रिय आहेत.

त्याच्या चार हातांपैकी एका हातात पाश, दुसर्‍या हातात अंकुश, तिसर्‍या हातात वरद मुद्रा आणि चौथ्या हातात अभय मुद्रेबरोबर मोदक धारण केलेला आहे. त्याचे वाहन उंदीर आहे. जो कुणी गणपतीची नेहमी पूजा करतो त्या व्यक्तीला योगीत्व प्राप्त होते.' हे गणराया! तुला प्रणाम करतो.

स्नान, पंचामृत स्नान:
विधी: पहिल्यांदा पाण्याने, नंतर पंचामृताने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घातले जाते. याला क्रमश: स्नानिय समर्पण, पंचामृत समर्पण, शुद्धोदक स्नान असे म्हणतात.
मंत्र:
स्नान समर्पण (शुद्ध पाण्याने स्नान): 'हे देवा! सर्व पापांचा नाश करणारे आणि शुभ असलेल्या गंगाजलाने तुला स्नान घालत आहे. तू त्याचा स्वीकार कर'.
पंचामृत स्नान: (पंचामृतापासून स्नान)
'हे प्रभू! दूध, दही, तूप, मध आणि साखरेनेयुक्त पंचामृताने तुला आंघोळ घालत आहे. तू त्याचा स्वीकार कर.'
शुद्धोदक स्नान (पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान):
'हे प्रभू! या शुद्ध पाण्याच्या रूपात गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी आणि गोदावरी समाविष्ट आहेत. तू स्नानासाठी हे जलग्रहण कर.'
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून स्नान समर्पित करा.

वस्त्र किंवा उपवस्त्र:
वस्त्र किंवा उपवस्त्र असे दोन वस्त्र अर्पित करा.
मंत्र:
1. ऊन, वारा, पावसापासून संरक्षण करणार्‍या 'हे देवा! हे वस्त्र तुझ्या सेवेत अर्पण करतो. कृपया तू त्याचा स्वीकार कर आणि मला सुख शांती लाभू दे.
2. 'हे प्रभू! विविध प्रकारची चित्रे, नक्षीकामाने सुशोभित असलेले हे वस्त्र तुला अर्पण करतो. कृपया तू त्याचा स्वीकार कर आणि मला सुख शांती लाभू दे'.
महागणपतीला नमस्कार करून वस्त्र अर्पण करा.

गंध, शेंदूर, दुर्वांकूर, फुले किंवा फुलमाळा इत्यादीने पूजा करा.
मंत्र:- 'हे देवा! सुखदायक, सुंदर आणि सौभाग्याप्रमाणे लाल असणारा हा शेंदूर शुभ्र आणि इच्छापूर्ती करणारा आहे. तुझ्या सेवेत तो सादर करत आहे. तू त्याचा स्वीकार कर!
(दुर्वा अर्पण करा)
'हे प्रभु! जाईजुईची सुगंधित फुले किंवा त्यांच्या माळा तुझी पुजा करण्यासाठी आणल्या आहेत. तू त्याचा स्वीकार कर!'
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपती तुला नमस्कार करतो.
(वरील मंत्र म्हणून गंध, फुले किंवा फुलमाळा, शेंदूर व विविध सुगंध, अंजीर, दुर्वांकुर, गुलाल इत्यादी अर्पण करा)

सुगंधित धूप
अगरबत्ती लावून देवापुढे ओवाळा.
मंत्र: उत्तम गंधयुक्त वनस्पतीच्या रसापासून तयार केलेला धूप 'हे प्रभू! तुझ्या सेवशी समर्पित आहे. तू त्याचा स्वीकार कर.
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून धूप समर्पित करा. (वरील मंत्र बोलून धूप सगळीकडे पसरवा)

webdunia
WD
दीप दर्शन:
यासाठी एक वेगळा दिवा लावला जातो. दिवा लावल्यानंतर हात धुऊन खालील मंत्र म्हणा.
मंत्र: 'हे देवा! कापसाच्या वातीपासून प्रज्वलित दिवा तुझ्या सेवेत अर्पण करत आहे. तो त्रैलोक्याचा अंधकार दूर करणारा आहे. हे दीप ज्योतिर्मय देवा! हे माझ्या परमात्मा स्वरूप गणपती देवा! मी तुला हा दीपक अर्पण करत आहे. हे नाथा! तू मला नरक यातनापासून वाचव. माझ्याकडून झालेल्या पापांची मला क्षमा कर.'

ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून दीप प्रज्वलित करा.
(वरील मंत्र बोलून दिव्याचा प्रकाश गणपती्च्या दिशेने प्रज्वलित करा) (नंतर हात धुऊन घ्या)

नैवेद्य दाखवा.
गणपतीला मोदक सर्वांत जास्त आवडतात. विविध प्रकारचे मोदक, मिठाई, फळांमध्ये केळी, सफरचंद, चिकू इत्यादी अर्पण करावेत.
देवाला नैवद्य अर्पण करण्यापूर्वी दोन्ही हात जोडून प्रार्थना करा की या नैवद्याचे अमृत होऊ दे. ‍त्यानंतर खालील मंत्र म्हणून नैवद्य अर्पण करा.

मंत्र: 'हे देवा! श्रीखंड, दूध, दही, तूपापासून तयार केलेले खाद्यपदार्थ नैवद्याच्या रूपात अर्पण करत आहे. तू त्याचा स्वीकार कर!'
'हे देवा! तू हे नैवद्य ग्रहण करून तुझ्याप्रती माझ्या मनात असलेली भक्ती सार्थक कर. मला परलोकात शांती मिळू दे.'
(त्यानंतर खालील प्रत्येक मंत्र म्हणून पाणी सोडा)
1. ॐ प्राणाय स्वाहा
2. ॐ अपानाय स्वाहा
3. ॐ समानाय स्वाहा
4. ॐ उदानाय स्वाहा
5. ॐ व्यानाय स्वाहा


webdunia
WD
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून नैवद्याच्या रूपात मोदक व फळे अर्पण करा.
(त्यानंतर खालील मंत्र म्हणून पुन्हा पाणी सोडा)
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपती तुला नमस्कार!
आचमनासाठी, हस्त प्रक्षालनासाठी जल अर्पण करत आहे.
(पुन्हा पाणी खाली सोडा)

दक्षिणा किंवा नारळ (श्रीफळ)
एक श्रीफळ ‍‍किंवा रोख दक्षिणा इष्ट देवाला अर्पण केली जाते.
(खालील मंत्र म्हणून दक्षिणा व श्रीफळ गणपती चरणी अर्पण करा)
मंत्र: 'हे देवा! हे श्रीफळ मी तुझ्यासमक्ष अर्पण केले आहे. तुझ्या आशीर्वादाने मला आयुष्यभर यश मिळू दे.'
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून श्रीफळ व दक्षिणा अर्पण करा.

महाआरती: कापराच्या एक किंवा तीन वड्या प्रज्वलित करून आरती केली जाते.
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपती चरणी नमस्कार करून निरंजन अर्पण करा.
(हात जोडून प्रणाम करा. आरती झाल्यावर हात धुवा)

पुष्पांजल
विधी: हातात फुले किंवा फुलांच्या पाकळ्या घ्या आणि खालील मंत्र बोलून फुले देवाच्या चरणी अर्पण करा.
(खालील मंत्र बोलून पुष्पांजली अर्पण करा)
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून मंत्र पुष्पांजली अर्पण करा.

प्रदक्षिण
(खालील मंत्र म्हटल्यानंतर एक प्रदक्षिणा पूर्ण करा. गणपतीला एकच प्रदक्षिणा मारली जाते हे लक्षात ठेवा)
मंत्र: मनुष्याने केलेली सर्व पापे प्रदक्षिणा करताना पावला-पावलावर नष्ट होतात.
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून प्रदक्षिणा अर्पण करा.

प्रार्थना व क्षमाप्रार्थन
प्रार्थना: 'हे गणराया! तू विघ्नांवर विजय मिळविणारा विघ्नहर्ता आहेस. देवांचा प्रिय आहेस.' हे विनायका! तू ज्ञानसंपन्न आहेस. तुझ्या चरणी माझा नमस्कार, नमस्कार अनेक वेळा नमस्कार. 'हे देवा! माझ्या सर्व कार्यात येणार्‍या विघ्नांचा तू नेहमी सर्वनाश कर.'

क्षमा प्रार्थना-
पूजा, विधी करताना माहितीच्या अभावाने काही चुका होऊ शकतात. त्यासाठी क्षमा प्रार्थना केली जाते. त्यासाठी हात जोडून खालील मंत्र म्हणा.
मंत्र: 'हे प्रभू! मला मंत्र आणि भक्ती येत नाही. मला स्तुतीही करता येत नाही. स्वभावाने मी आळशी असल्यामुळे विविध पूजन साहित्याने तुझी विधीवत पूजा करू शकलो नाही.'

'हे प्रभु! मी अज्ञानाने तुझी जी पूजा केली आहे, कृपा करून ती मान्य करून घे. माझ्याकडून झालेल्या चुकांची मला क्षमा कर. मी या केलेल्या पूजेमुळे तु माझ्यावर प्रसन्न राहशील अशी अपेक्षा करतो.

प्रणाम किंवा पूजा समर्प
विधी: पूजेच्या शेवटी साष्टांग प्रणाम केला पाहिजे किंवा पूजा ईश्वराला समर्पित करणे आवश्यक आहे.
(प्रथम साष्टांग प्रणाम करा. त्यानंतर हातात पाणी घेऊन खालील मंत्र म्हणा व पाणी पात्रात सोडा.)
मंत्र: या पूजेमुळे सिद्धी बुद्धीसहीत महागणपती संतुष्ट होऊ दे. या पूजेवर त्याचा अधिकार आहे माझा नाही.

webdunia
WD
विसर्जन:- विसर्जनावेळी हातात अक्षता व फुले घेवून खालील मंत्र म्हणा.
'हे सर्वश्रेष्ठ गणपती देवा! तुम्ही तुमच्या स्वस्थानी म्हणजे जेथे ब्रह्मा, विष्णू इत्यादी देवांचा वास आहे त्याठिकाणी पुन्हा प्रस्थान करा. मी या पूजेत ज्या देवांची पूजा केली आहे त्यांनी पुन्हा पुन्हा माझ्या कल्याणासाठी यावे.
(अक्षता व फुले मूर्तीवर वहावीत. )

आता खालील मंत्र म्हणून मूर्ती जागेवरून थोडीशी हलवा.

ॐ शांती: ॐ शांती: ॐ शांती:

Share this Story:

Follow Webdunia marathi