Select Your Language
श्रीगणेशाचे भजन
मंगलमूर्ती माझे आई, मजला ठाव द्याव पायीं।।1।।सिद्धीबुद्धि मयुरामाई, मलजा ठाव द्यावा पायी।।2।।श्रीगजानन जय गजानन, जय गजानन मोरया।।3।।श्रीगणनाथ जय गणनाथ। मीं अपराधी घ्या पदरांत।।4।।श्रीगजाननपद सेवावे, काया वाचा मनोभावें।।5।।हेरंबमाय दाखवि पाय, दुजवीण मगेना करूं मीं काय।।6।।गजानन, गजानना, पार्वतीच्या नंदना मोरया गजानना।7।।धांवत ये वा गणराया, दीनाते मज ताराया।।8।।पायीं हळूहळू चाला, मुखानें गजानन बोला।।9।।ज्याला म्हणती पुत्र शिवाच, तो हा गणपती मित्र जिवाचा।।10।।मोरया रे, बाप्पा मोरया रे, मोरया रे, बाप्पा मोरया रे।।11।।गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लौकर या।।12।।