Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिकचा चांदीचा गणपती

- पांचाली बॅनर्जी

नाशिकचा चांदीचा गणपती
PRPR
नाशिक शहर तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे मंदिरांची येथे वानवा नाही. नाशिकची ओळख अनेक कारणांनी होत आहे. त्यामध्ये रविवार कारंजा मित्र मंडळाच्या चांदीच्या गणपतीचा समावेश आहे. नाशिकमधील रविवार कारंजा हा बाजारपेठेचा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. येथे ९० वर्षांपासून गणपती मंदिर आहे. सन १९७८ साली या मंदिरात मूर्ती बसविण्यात आली म्हणून रविवार कारंजा म्हटलं की, चांदीचा गणपती हे समीकरण ठऱलेले आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरुप दिले. त्यात रविवार कारंजा मित्रमंडळानेही सक्रीय भाग घेतला म्हणूनच स्वातंत्र्यपूर्व काळात या मंदिरावर ब्रिटिश पोलिसांची करडी नजर होती.

सन १९७८ साली रविवार कारंजा मित्र मंडळाने गणपतीची पूर्ती चांदीची बसविण्याचा निर्णय घेतला. तेव्हा परिसरातील व्यावसायिक, नाशिक मंडळाचे हितचिंतक आणि भाविक यांनी एकत्र येऊन चांदीचा गणपती बनविण्याची संकल्पना उचलून धरली. सर्वांच्या हातभारातून चांदीची मूर्ती साकारली. तेव्हापासून रविवार कारंजा मित्रमंडळाचा गणपती सर्व नाशिककरांचे आकर्षण ठरू लागला. हळूहळू नंतर गणपतीची महती सर्वदूर पोहोचली आणि सर्व गणेशभक्तांच्या दृष्टीने या मूर्तीला महत्त्व प्राप्त झाले.

रविवार कारंजा मित्रमंडळांना अनेक संस्था व व्यक्तींकडून मदत मिळते. या मदतीचा वापर मंडळ सार्वजनिक उपक्रम राबविण्यासाठी करत आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम मंडळाने राबविले आहेत. आता निराधार मुलांसाठी निवारागृह, वृध्दाश्रम बांधण्याचा संकल्प हे. महानगरपालिकेकडून जागा मिळण्याची मंडळास प्रतीक्षा आहे. मुंबईतील प्रसिध्द सिध्दीविनायक मंदिराशी या मंडळाची संलग्नता आहे.

धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविणार्‍या या मंडळाचा चांदीच्या गणपती नाशिकमध्ये मानाचा मानला जातो. पुण्यातील दगडूशेठ हलवाईचा गणपती जसा प्रसिध्द आहे. त्याप्रमाणे नाशिकचा हा चांदीचा गणपती प्रसिध्द आहे. हा गणपती पाहण्यासाठी गणेशोत्सवात भाविकांची प्रचंड गर्दी उसळते. केवळ गणेशोत्वात नव्हे तर अन्य वेळीही सर्व मंदिराकडे वळतात. या गणपतीच्या मूर्तीत दरवर्षी चांदीची भर टाकली जाते. वाढतावाढता वाढे या उक्तीप्रमाणे आज २०१ किलो चांदीचा गणपती पहावयास मिळतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi