Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्रीगणेशाच प्रतिमेचे आफ्रिकेत नाणे

श्रीगणेशाच प्रतिमेचे आफ्रिकेत नाणे

वेबदुनिया

आबालवृद्धांसह सर्वाचा आवडता गणेशोत्सव सुरू झाला आहे. यानिमित्त देशभरात आनंदाचे वातावरण आहे. या गणेशोत्सवाची क्रेझ परदेशातही आहे. आफ्रिका खंडातील आव्हरी कोस्ट या देशातील एका कंपनीने गणेशाची एक हजार नाणी उपलब्ध केली आहेत. नगर येथील हरजितसिंग वधवा यांनी सर्वप्रथम हे नाणे खरेदी केले आहे.

वधवा यांना देवी, देवतांची चित्रे असलेली नाणी गोळा करणचा छंद आहे. त्यांच्याकडे थालंडसह विविध देशांची नाणी संकलित आहेत. आफ्रिकेतील आव्हरी कोस्ट या देशात श्रीगणेशाचे नाणे उपलब्ध असल्याची माहिती मिळताच, त्यांनी त्याचे ऑनलाइन बुकिंग करून 8 हजार 100 रुपयाला खरेदी केले. वैशिष्टय़पूर्ण असलेल्या या नाण्याबरोबरच श्रीगणेशाची महती सांगणारे माहितीपत्रकही देण्यात येते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चुरम्याचे मोदक