मध्यप्रदेशातील इंदूर येथे बडा गणपती मंदिर असून गणेशाची महाकाय मुर्ती आहे. मंदिर मोठे असून नवसाला पावणारा गणपती आहे. गणेश मूर्ती बारा फुट उंचीची असून विशाल आहे. गणेशाचे विशाल व अतिशय सुंदर रूप पाहून गणेशभक्त आकर्षित होत असतात. संकष्ट चतुर्थी, गणेशोत्सवात भाविकांची मोठी गर्दी असते.