Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभिनेता कमाल खानने भारत सोडला!

अभिनेता कमाल खानने भारत सोडला!
मुंबई , सोमवार, 19 मे 2014 (10:35 IST)
बॉलिवूड अभिनेता कमाल खान अर्थात केआरके याने भारत सोडला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) एकहाती सत्ता मिळली. त्यामुळे कमाल खानने हा निर्णय घेतला आहे. नरेंद्र मोदी निवडून आल्यास आपण देश सोडू, असे वक्तव्य कमाल खान याने केले होते.

कमाल खान याने 'ट्विटर'वरून आपण देश सोडत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याने पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब अख्तरसह आपला फोटो अपलोड केला आहे. कमालने लोकसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वीच देश सोडणे पसंत केले आहे. या लोकसभा निडवडणुकीत कमाल खाननेही निवडणूक लढवून आपले भविष्य आजमावले होते.  मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून कमाल खानने निवडणूक लढविली होती. मात्र, त्यात त्याचा दारुण पराभव झाला. 

Share this Story:

Follow Webdunia marathi