Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आडवे येणार्‍यांनी आधी विचार करावा- उद्धव ठाकरे

आडवे येणार्‍यांनी आधी विचार करावा- उद्धव ठाकरे
मुंबई , शनिवार, 17 मे 2014 (11:48 IST)
शिवसेनेच्या मार्गात आडवे येणार्‍यांनी आधी आपला विचार करावा, असा दम शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी मनसेप्रमुख राज ठाकरेंचे नामोल्लेख न करता दिली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, यापूर्वीही आडवे आले, तेव्हा त्यांना मी माफ केले होते, आजही करतो. परंतु यापुढे आडवे येणार्‍यांनी विचार करावा, असा इशारा दिला. राज्यातील जनता सत्ताधार्‍यांना कंटाळली आहे. या निकालाचा परिणाम आगामी विधानसभेच्या निवडणुकांत नक्कीच दिसेल.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तरी पावसाळ्यात निवडणुका घेणे सोपे ठरणार नाही. त्यामुळे निवडणुका ठरलेल्या वेळेवरच व्हायला हव्या, असे नसल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत मिळालेले घवघवीत यश हे महायुतीच्या कार्यकर्त्यांना अर्पण केल्याचे  शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी सांगितले. राज्यातही महायुतीला जास्त जागा मिळाल्या आहेत. महायुती एकत्र असल्यानेच हे यश प्राप्त झाले आहे त्यामुळे हे यश मी महायुतीच्या कार्यकर्त्यांना अर्पण करतो. नरेंद्र मोदी यांच्या रूपाने चांगला चेहरा मिळाल्यामुळे आमची ताकद वाढली असल्याचेही सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi