Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आसाममध्ये हिंसाचार; पोलिस कॉन्स्टेबल ठार

आसाममध्ये हिंसाचार; पोलिस कॉन्स्टेबल ठार
गुवाहाटी , शुक्रवार, 25 एप्रिल 2014 (11:56 IST)
आसाममधील कोक्राझार लोकसभा मतदारसंघातील दोन मतदान केंद्रावर हिंसक जमावाने हल्ला केला. यात एक पोलिस कॉन्स्टेबलाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच सीमा सुरक्षा दल आणि पोलिसांची पथके बालप्रा आणि हरबंगा येथे तातडीने रवाना झालीत. निवडणूक कर्मचारी आणि पोलिसांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहेत. हल्लेखोरांना मतदारसंघाचा ताबा घेतला होता. त्यांना पांगविण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबार केला. हल्ला झाला तेव्हा या मतदान केंद्रात निवडणूक कर्मचार्‍यासह चाळीस मतदार होते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi