Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'उद्धट' लोकांसाठी मी ही उद्धटच- उद्धव ठाकरे

'उद्धट' लोकांसाठी मी ही उद्धटच- उद्धव ठाकरे
मुंबई , मंगळवार, 22 एप्रिल 2014 (12:28 IST)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या टीकेला कडाडून प्रत्युत्तर दिले आहे. मी उद्धट लोकांसाठी उद्धटच असल्याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना दिले आहे. उद्धव ठाकरे मुंबईत एका सभेत बोलत होते.

महाराष्ट्रातील जनता नरेंद्र मोदींना निराश करणार नाही. निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेचे ढाणे वाघ उतरवले आहेत. ते कुठंही कमी पडणार नाहीत, असे सांगून उद्धव यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.

शरद पवार यांनी गायरानाची जमीन लाटली असल्याचे थेट आरोपही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi