Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जेदयूशी युती मुळीच नाही – लालूप्रसाद यादव

जेदयूशी युती मुळीच नाही – लालूप्रसाद यादव
पाटणा , सोमवार, 19 मे 2014 (10:11 IST)
बिहारचे नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, सरकार वाचवण्यासाठी जनता दल (यूनायटेड) करताना दिसत आहे. यामुळे लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार हे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी जनता दलाशी युती करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

बिहारमध्ये जेदयूशी मुळीच युती करणार नसल्याचे लालूंनी स्पष्ट केले आहे. रविवारी जेडीयूची बैठक झाल्यानंतर आरजेडीची बैठक होईल. यात आरजेडी नेत्यांशी बिहारच्या सद्यस्थितीबाबत चर्चा केली जाईल, असे यादव यांनी सांगितले.

दरम्यान, बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. सरकारच्या बहुमतासाठी 122 जागांची आवश्यता आहे. त्यापैकी 116 आमदार जेदयूकडे आणि आरजेडीकडे 24 आहेत. तर भाजपकडे 90, काँग्रेसचे 4, भाकपचा 1 आणि 6 अपक्ष आमदार आहेत. काँग्रेसने जेदयुला आपला पाठिंबा कायम ठेवला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi