माझ्या मराठी तरूणांच्या तोंडातील घास हिसकवण्याचा प्रयत्न करणार्या परप्रांतीयांना पुन्हा बदडून काढेल, असा सज्जड दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना यांनी सोमवारी दिली. दक्षिण मुंबई मतदार संघातील मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्या प्रचारसभेत राज ठाकरे बोलत होते.
परप्रांतीय महाराष्ट्रात येतात. नोकर्या मिळवतात, पण माझे मराठी तरूण नोकरीपासून वंचीत राहतात. माझ्या मराठी तरुणांना नोकर्या मिळाल्याच पाहिजे, राज ठाकरेंनी ठणकावून सांगितले. परप्रांतीयांचे लोंढे थांबलेच पाहिजे. परंतु परप्रांतीयांचे लोंढे थांबले नाहीत तर यापुढेही मनसैनिक गप्प बसणार नाहीत.
मुंबईच्या पाईपलाइनला लागून 40 हजार झोपड्या आहेत. परंतु राज्यकर्त्याचे त्यांच्याकडे लक्ष नसल्याचे राज ठाकरे म्हणाले. अबू आझमीसारखा माणूस येथे दोन ठिकाणी कसा निवडून येतो? असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील रेल्वे स्टेशनवर सर्व स्टॉल परप्रांतीयांना कसे मिळतात. यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही. परप्रांतीयांचे ओझे आम्ही का वाहायचे, असेही राज ठाकरे म्हणाले.