Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात मतदार यादीत घोळ; अमोल पालेकर मतदानापासून वंचित

पुण्यात मतदार यादीत घोळ; अमोल पालेकर मतदानापासून वंचित
पुणे , गुरूवार, 17 एप्रिल 2014 (15:40 IST)
राज्यात दुसर्‍या टप्प्यात उत्साहात मतदान सुरु असताना पुण्यातील शिवाजी नगर भागात मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे उघडकीस आले आहे.

हजारो मतदारांची मतदान यादीत नावे नाहीत. या घोळामुळे बॉलिवूड अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर, गायक सलील कुलकर्णी, अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, संध्या गोखले यांना मतदानापासून वंचित राहावे लागले आहे.

पुण्यातील अनेक मतदान केंद्रांवर घोळ असल्याचे समजते. मतदारांची नावे यादींमधून गायब झाल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळे मतदारांचा गोंधळ उडाला आहे. पुण्यात एकूण 2185 मतदान केंद्रे आहेत. 19 लाख 68 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi