Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फोन टॅप करणारे महिलांना काय शक्ती देणार? राहुल गांधी

फोन टॅप करणारे महिलांना काय शक्ती देणार? राहुल गांधी
पुणे , मंगळवार, 15 एप्रिल 2014 (17:21 IST)
गुजरात राज्यात महिलांचे फोन टॅप करणारे, त्यांच्यावर पाळत ठेवणारे, त्यांना काय शक्ती मिळवून देणार, असा सवाल कॉंग्रेस उपाध्यक्ष कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी पुण्यातील सभेत उपस्थित केला. विशेष म्हणजे संपूर्ण देशात महिलांना सर्वाधिक शक्ती मिळवून देण्याचे काम कॉंग्रेसनेच केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

पुण्यातील कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार विश्वजीत कदम यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी पुण्यात आले आहेत. येथील एसएसपीएमएसच्या मैदानावर सभा घेतली. या सभेला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह राज्यातील इतर नेते उपस्थित होते.

राहुल म्हणाले, महिलांना शक्ती मिळवून देण्यासाठीच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना 50 टक्के आरक्षण देण्याचे काम कॉंग्रेसच्या काळात झाले. विशेष म्हणजे संसदेत तसेच विधीमंडळात महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यासाठी कॉंग्रेसने विधेयक आणले. मात्र, त्याला भाजपनेच विरोध केला. एकीकडे छत्तीसगढमधून महिला बेपत्ता होताहेत. गुजरातमध्ये महिलांचे फोन टॅप केले जाताहेत आणि हेच लोक दिल्लीमध्ये महिलांना शक्ती देण्याचे पोस्टर लावताहेत. महिलांना शक्ती द्यायची असेल, तर सर्वांत आधी त्यांचा सन्मान राखायला शिकले पाहिजे,  असे राहुल गांधी यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi