Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मतदान करू न दिल्याने तरुणाची आत्महत्या

मतदान करू न दिल्याने तरुणाची आत्महत्या
बरेली , गुरूवार, 17 एप्रिल 2014 (15:38 IST)
मतदान करू न दिल्याने उत्तर प्रदेशात एका तरूणाने स्वत:ला जाळून घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (गुरुवारी) घडकीस आली आहे. हरि सिंह (25) असे या तरुणाचे नाव आहे. हरिसिंहकडे ओळखपत्र होते. विशेष म्हणजे तो चारवेळा मतदार केंद्रावर रांगेतही उभा राहिला. परंतु त्याचे नाव मतदान यादीत नव्हते. त्यामुळे मतदान केंद्रावरील कर्मचार्‍यांनी त्याला मतदान करण्यास रोखले. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या हरिसिंहने संतापाच्या भरात जाळून घेत आत्महत्या केली.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंवला येथील देवचरा येथील एका मतदान केंद्रावर मद्यधुंद अवस्थेत हरि सिंहने पोहोचला. रितसर रांगेतही उभा राहिला. परंतु मतदार यादीत त्याचे नाव नव्हते. त्यामुळे त्याने धिंगाणा घातला. हरि सिंह तो एका विशिष्ट पक्षाला मत देण्यासाठी आग्रही होता. याआधी तो तो चारवेळा रांगेत उभा राहिला. यादीत नाव नसल्याने कर्मचार्‍यांनी त्याला परत पाठवले होते. यामुळे संतापलेल्या हरि सिंहने मतदान केद्रांसमोरच स्वत:ला जाळून घेतले. तातडीने त्याला रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi