Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रात दिग्गजांना धक्का; सुशीलकुमार शिंदे, भुजबळ आणि राणेंचा पराभव

महाराष्ट्रात दिग्गजांना धक्का; सुशीलकुमार शिंदे, भुजबळ आणि राणेंचा पराभव
मुंबई , शुक्रवार, 16 मे 2014 (15:29 IST)
16 लोकसभा निवडणुकीच्या निकालात संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेच्या महायुतीची जोरदार घौडदौड सुरु आहे. अपेक्षेप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादी पिछाडीवर आहे. यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

नाशिकमधून राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांचा सुमारे दीड मतांच्या फरकाने पराभव झाला आहे. सोलापुरात सुशीलकुमार शिंदे हे जवळपास एक  लाख मतांच्या फरकाने पिछाडीवर आहेत. त्यांचाही पराभव होण्याची दाड शक्यता आहे. प्रफुल्ल पटेल 70 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांचा संजयकाका पाटील यांनी दीड लाख मतांच्या फरकाने पराभव केला आहे. मावळमधून श्रीरंग बारणे यांनी लक्ष्मण जगताप यांचा एक लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे. ठाण्यात शिवसेनेचे राजन विचारे हे दीड लाख मतांनी विजयी झाले आहे.

दुपारी दोन वाजेपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील 48 जागांपैकी भाजपचे 23, शिवसेनेचे 20 जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत. यातील अनेकांचा विजय झालेला आहे. काँग्रेसमधून फक्त अशोक चव्हाण आघाडीवर आहेत. तर, राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे, धनंजय महाडिक, सुनील तटकरे, उदयनराजे भोसले हे चार आघाडीवर आहेत. स्वाभिमानीचे राजू शेट्टी पुढे आहेत. सदाभाऊ खोत व विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याच आघाडी-पिछाडीचा खेळ सुरु आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi