मी केवळ रबर स्टॅम्प मुख्यमंत्री नसल्याचे बिहारचे नवनियुक्त मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी म्हटले आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी मांझी यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती. मांझी यांच्यावर रबर स्टॅम्प मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून विरोधक टीका करत होते. तर, भाजप नेते किर्ती आझाद यांनी, नितीश कुमारांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदी मनमोहनसिंग यांची निवड केल्याची खोचक टीका केली होती. तर, सुशीलकुमार मोदी यांनी नितीश कुमार यांनी डमी मुख्यमंत्री उभा करून, त्यांचा फक्त रबर स्टॅम्पपुरता वापर करण्याचे ठरविले आहे.
भाजपच्या टीकेवरून त्यांची दलितविरोधी भूमिका दिसून येत आहे. भाजपने दलितांचा अपमान केला आहे, अशा शब्दात मांझी यांनी टीकाकारांचा समाचार घेतला आहे.