16 लोकसभा निवडणुकीत भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांच्या विजयात मुस्लिमांनी सहभाग नोंदवून त्यांनी आपले धर्मनिरपेक्षत्व सिद्ध केल्याचे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी म्हटले आहे. भाजपच्या भुलथापांना मुस्लिमबांधव बळी पडल्याचा आरोपही आझम खान यांनी केला आहे.
त्यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि सप प्रमुख मुलायमसिंह यादव यांचे सर्मथन केले. कोणालाही पराभूत करण्याचे मुस्लिमांचे धोरण नव्हते. मात्र, भाजपसारख्या पक्षाने त्यांच्यावर चुकीच्या आश्वासनांचे जाळे टाकल्याचे खान म्हणाले.
खान यांनी निवडणूक प्रचारामध्ये मोदींवर हल्ले चढवले होते. 2002 च्या गुजरात दंगलीतील भूमिकेबद्दल त्यांच्यावर टीका करण्यात आली होती, तसेच कुत्र्याचे पिलू वक्तव्याच्या संदर्भात मोदी या पिलाचे मोठे भाऊ असल्याचे म्हटले होते. भाजप नेते कलराज मिश्र यांनी अखिलेश सरकारचा राजीनामा मागितला होता.