Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोदींविरोधात शिवसेनाचा उमेदवार नाही- आदित्य ठाकरे

मोदींविरोधात शिवसेनाचा उमेदवार नाही- आदित्य ठाकरे
, शुक्रवार, 21 मार्च 2014 (17:32 IST)
मुंबई- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसी अथवा लखनौमध्ये शिवसेनेचा कोणताही उमेदवार निवडणूक लढणार नसल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी 'टि्वटर'वरून स्पष्ट केले आहे.  
 
शिवसेना आणि भाजप यांच्यात केवळ महाराष्ट्रात युती आहे. त्यामुळे महाराष्ट्राबाहेर शिवसेना आपले स्वतंत्र उमेदवार उभे करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. आपल्या वक्तव्याचा मीडियाने विपर्यास केल्याचेही  आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
 
शिवसेनेचे बिहारमध्ये सात आणि दिल्लीत पाच उमेदवार निवडणूक लढणार असल्याचे वृत्त काही खासगी वृत्त वाहिन्यांनी प्रसिद्ध केले होते. तसेच, गुजरातमध्येही शिवसेना भाजप विरोधात लढणे शक्य असल्याचेही या  वृत्तात म्हटले होते. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी यावर अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. 

Share this Story:

Follow Webdunia marathi