Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'मोदी लाट' केवळ माध्यमांमध्येच- मनमोहन सिंग

'मोदी लाट' केवळ माध्यमांमध्येच- मनमोहन सिंग
दिसपूर , शुक्रवार, 25 एप्रिल 2014 (11:09 IST)
16 लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात देशाचे विद्यमान पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी आसाममध्ये आपला मतदानाचा हक्क बजाविला. यावेळी सिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर यादेखील त्यांच्यासमवेत होत्या. यावेळी मनमोहन म्हणाले 'मोदी लाट' ही केवळ मीडियाने निर्माण केली आहे. देशात कुठेच मोदी लाट जाणवत नसल्याचेही सिंह यांनी सांगितले.

दिसपूर येथील सरकारी शाळेमधील मतदान केंद्रामध्ये सिंग व त्यांच्या पत्नीने मतदान केले. दरम्यान, देशामध्ये आसाम, तमिळनाडु, राजस्थान, महाराष्‍ट्र, पश्‍चिम बंगाल अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये मतदान पार पडले.

Share this Story:

Follow Webdunia marathi