भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्रात एनडीएचे सरकार आले तर आम्ही विरोधी पक्षात बसू, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज (बुधवार) स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते डी.पी.त्रिपाठी म्हणाले, केंद्रात स्थिर सरकार सत्तेवर येणे गरजेचे असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी दिल्लीमध्ये केले होते. पटेल यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी एनडीएमध्ये सहभागी होईल का किंवा त्यांना पाठिंबा देईल का, याबाबत विविध चर्चांना उधाण आले. या सर्व पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रवक्त्यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. आपण विरोधी पक्षात बसू पण मोदी सरकारला पाठिंबा देणार नसल्याचे त्रिपाठी यांनी स्पष्ट केले आहे.