Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विश्वास यांच्यावर मुलांना बिअर पाजल्याचा आरोप

विश्वास यांच्यावर मुलांना बिअर पाजल्याचा आरोप
अमेठी , सोमवार, 21 एप्रिल 2014 (12:45 IST)
आम आदमी पार्टीचे उमेदवार कुमार विश्वास यांच्यावर अमेठीच्या जनतेने गर्दी जमवण्यासाठी शाळकरी मुलांना बिअर पाजल्याचा आरोप केला आहे. ‘आप’ची रॅली आणि रोड शो मध्ये लोकांना सहभागी करुन घेण्यासाठी कुमार विश्वास प्रत्येकी 200 रुपये देत असल्याचाही त्यांचा आरोप आहे. रविवारी ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी कुमार विश्वास यांच्या प्रचारासाठी रोड शो केला, यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

दिल्ली का भगोडा असे ठळक अक्षरात लिहिलेले काळे बॅनर त्यांच्या रोड शो दरम्यान अमेठीच्या जनतेने झळकवले. कुमार विश्वास यांनी या विरोधी आंदोलनामागे भाजप आणि काँग्रेसचा हात असल्याचे म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi