‘आप’ला पुन्हा पाठिंबा देऊन दिल्लीत सरकार स्थापनेऐवजी नव्याने निवडणुकांना सामोरे जाऊ, असे काँग्रेसने रविवारी स्पष्ट केले. दिल्ली विधानसभा भंग करून निवडणुका घेण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे ‘आप’ला आता पुन्हा सरकार स्थापन करण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही, असे काँग्रेस प्रवक्ते मुकेश शर्मा यांनी सांगितले.
दिल्लीत नवे सरकार स्थापन करण्यासाठी ‘आप’ला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील नागरिकांचा विश्वासघात केला आहे. विधानसभा भंग करण्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.