वाराणसीतील कॉँग्रेसचे उमेदवार अजय राय यांच्या बचावसाठी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी सरसावले. मतदान बूथवर निवडणूक चिन्ह दाखविल्याबद्दल अजय राय यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुरलीमनोहर जोशी त्यांचा बचाव करताना म्हणाले, प्रत्येक जण अजय राय यांच्याशी हस्तांदोलन करत आहे. मग त्यांचे हातही कापणार का? भाजप मोठ्या फरकाने जिकंणार असल्याने त्यांनी अशा लहान गोष्टींकडे लक्ष देता कामा नये. असेही स्पष्ट केले.
जोशी यांनी मोदींसाठी वाराणसीची सीट सोडली आहे. त्यामुळे मोदींना जागा दिल्याची नाराजी नसल्याचेही जोशींनी यावेळी स्पष्ट केले.