Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अजय राय यांच्या विरोधात 'एफआयआर'

अजय राय यांच्या विरोधात 'एफआयआर'
वाराणसी , मंगळवार, 13 मे 2014 (10:12 IST)
गुजरातमध्ये 30 एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांनी केले होते तेच काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांनीही केले. आपल्या कुर्त्यावर पक्षाचे निवडणूक चिन्ह पंजाचा बॅच लावून ते मतदानाला गेले. शेवटी निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर अजय राय यांच्याविरोधात ‘एफआयआर’ दाखल करण्यात आला.

निवडणूक आयोगाने राय यांच्याशी संबंधित सीसीटीव्ही फुटेजही मागवले आहे. आयोगाचे पर्यवेक्षक प्रवीणकुमार म्हणाले, की मतदानावेळी पक्षाच्या चिन्हाचे प्रदर्शन जनप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 130 चे उल्लंघन आहे. प्रकरणाची चौकशी करून मुख्य आयुक्तांकडे अहवाल देण्यात येणार आहे.

भाजपने याबाबत अजय राय यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. दुसरीकडे राय यांनी आपल्या बचावात म्हटले आहे, की काँग्रेस पक्षाचा उमेदवार असल्याने मी दररोज पक्षाचे चिन्ह लावून फिरतो. सोमवारीदेखील मी नेहमीप्रमाणेच बूथवर गेलो होतो. 

Share this Story:

Follow Webdunia marathi