Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अण्णा द्रमुकच्या नेत्याची जयललितांनी केली हकालपट्टी

अण्णा द्रमुकच्या नेत्याची जयललितांनी केली हकालपट्टी
चेन्नई , गुरूवार, 15 मे 2014 (16:31 IST)
केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार स्थापन होणार असल्याचे एक्झिट पोलने संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर एनडीएशी युती करावी असा सल्ला देणे अण्णा द्रमुकच्या एका नेत्याला चांगलेच महागात पडले आहे. अण्णा द्रमुकचे (एआयएडीएमके) माजी खासदार मलाईसॅमी यांची पक्षातून हकालपट्टी करण्‍यात आली आहे. मलाईसॅमी यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना सल्ला दिला होता, की त्यांनी एनडीएसोबत हात मिळवणी करावी. जयललिता यांनी गुरुवारी मलाईसॅमी यांची तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी केली आहे.

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार या लोकसभा निवडणुकीत अण्णा द्रमुकला तमिळनाडुमधे तीस जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारस्थापनेमध्ये  जयललिता यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. जयललिता या किंगमेकरही ठरू शकतात. विशेष म्हणजे जयललिता आणि नरेंद्र मोदी यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या पार्श्वभूमीवर जयललिता मोदींना पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi