केंद्रीय निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना नोटीस जारी केली आहे. 'जे लोक भाजपला मत देतील ते देश आणि देवाचा विश्वासघात करतील', असे केजरीवाल यांनी 2 मे रोजी अमेठीत वादग्रस्त वक्तव्य केले होते. आयोगाने केजरीवाल यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली आहे. त्यांना मंगळवारी (13 मे) सायंकाळपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.
दरम्यान, कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अमेठीतील मतदान केंद्रात प्रवेश केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने दोषी ठरवले. मात्र त्यांच्या विरुद्ध कारवाईला नकार देण्यात आला. हा कसला न्याय आहे, असा सवाल आपचे उमेदवार कुमार विश्वास यांनी ट्विटरवर केला.