Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

...आणि नरेंद्र मोदी झाले भावूक

...आणि नरेंद्र मोदी झाले भावूक
नवी दिल्ली , बुधवार, 21 मे 2014 (11:56 IST)
भारत मातेप्रमाणेच भारतीय जनता पक्ष माझी आई आहे आणि मुलगा कधीही आईवर कृपा करत नाही तर तिची सेवा करतो, असे सांगत नरेंद्र मोदी भावूक झाले. मोदी यांनी संसदीय कार्यकारिणीच्या बैठकीत आपले मनोगत व्यक्त करत होते. यावेळी नरेंद्र मोदींसह भाजपाच्या नेत्यांच्या डोळे पाणावले. कठोर प्रशासक अशी ओळख असलेल्या मोदींना भावूक झालेले बहुदा प्रथमच बघायला मिळाले.

भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी मोदींचे कौतुक करताना मोदींमुऴे हा दिवस बघायला मिळाल्याचे सांगिंतले. मोदींनी पक्षावर कृपा केली. असे सांगितले. परंतु अडवाणींनी असा शब्दप्रयोग करू नका, असे मोदींनी सांगितले. पक्ष माझ्यासाठी आईसारखा आहे. या आईची सेवा करण्यात आपल्याला धन्यता वाटत असल्याचे मोदींनी सांगितले. मोदींचे हे उद्‍गार ऐकताच सभागृहातल्या बहुतेक सर्व नेत्यांचे डोळे पाणावले.

भाजपाला आजचा दिवस हे पाच पिढ्यांच्या तपस्येनंतर मिळाले आहे. यासाठी भाजपच्या लाखो कार्यकर्त्यांच्या परिश्रम घेतल्याचेही मोदींनी आपल्या भाषणात सांगितले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi