भारतीय जनता पक्षाचे नेते गिरिराज सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. एकाच समाजात सर्व दहशतवादी असल्याचे वक्तव्य गिरिराज सिंहांनी केल्याने ऐन निवडणुकीत भाजपच्या अडचणी याढण्याची शक्यता आहे. यापूर्वी गिरीराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. मोदींना विरोध करणार्यांनी पाकिस्तानात जावे, असे गिरीराज यांनी म्हटले होते.
दहशतवाद हा देशाशी संबंधित विषय आहे. मग अशावेळी दहशतवादी कारवायांमध्ये अटक करण्यात आलेले सर्वजण एकाच समाजातील असताना निधर्मी नेते या सर्वाबाबत शांत कसे बसतात. असेही गिरिराज सिंह यांनी म्हटले आहे.