राष्ट्रीय लोकशाही आघाडीस (एनडीए) सशर्त पाठिंबा देण्याचे संकेत बिजु जनता दलाचे (बीजेडी) नेते जय पांडा यांनी आज (बुधवार) दिले आहेत. नवीन पटनाईक अध्यक्ष असलेल्या 'बीजेडी'तील जय पांडा हे ज्येष्ठ नेते आहेत.
पक्षात सर्वांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय घेतला जाईल. 'बीजेडी'च्या एका सदस्याने एनडीएला सशर्त पाठिंब्या देण्याचे सुचविले आहे परंतु, याबद्दल अजून पक्षात सविस्तर चर्चा झालेली नाही.