महाराष्ट्र विधानपरिषदेच 5 जागांची निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी संयुक्तपणे लढविणार आहे. विधानपरिषदेच 5 सदस्यांची मुदत 19 जुलै रोजी संपणार आहे. त्यामध्ये भाजपचे नितीन गडकरी यांचाही समावेश आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, पुणे शिक्षक, नागपूर पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातून निवडणूक काँग्रेस पक्ष लढविणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष औरंगाबाद आणि पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविणार आहे. ते पुढे म्हणाले, हा निणर्य रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यच्याबरोबर झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही उपस्थित होते.
गडकरी यांनी लोकसभेची निवडणूक लढविली आहे. याशिवा निवृत्त होणार्या सदस्यांमध्ये राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण, भाजपचे चंद्रकांत पाटील, अपक्ष सदस्य भगवानराव साळुंखे, वसंत खोटेरे यांचा समावेश आहे.
या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आला.