Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कॉंग्रेसच्या पराभवाचे खापर जाहिरात कंपनीवर

कॉंग्रेसच्या पराभवाचे खापर जाहिरात कंपनीवर
नवी दिल्ली , बुधवार, 21 मे 2014 (11:50 IST)
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला. काँग्रेसच्या काही नेत्यांनी पराभवाचे खापर पार्टीचा जाहिरात विभाग सांभाळणार्‍या जापानी कंपनीवर फोडले आहे.

'डेंन्तसू' या जापानी कंपनी कॉंग्रेसच्या जाहिरातीचे काम पाहते. यामुळे जाहिरात कंपनीच्या दोषापासून पळता येणार नाही, असे स्पष्ट करताना काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. डेन्तसू या कंपनीने पैसे तर जास्त आकारलेच शिवाय विविध प्रसारमाध्यमांमध्ये जाहिरातीचे दरही जास्त मान्य केले. डेंन्तसूला काँग्रेसने ६०० कोटी रुपयांचे मानधन देऊन काम दिल्याची चर्चा आहे. यापूर्वी भारतीय जनता पार्टी जाहिरातीच्या माध्यमातून लोकांना भुलवत असल्याची टीका काँग्रेसने केली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi