पंतप्रधान डॉ. मनङ्कोहनसिंग यांना सन्मानपूर्वक निरोप देण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली असून यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मनमोहन यांच्यासाठी 14 मे रोजी प्रीतीभोजनाचे आयोजन केले आहे. या खास आदरातिथ्याला यूपीए सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे.
लोकसभा निवडणुकांचे निकाल 16 मे रोजी लागणार असून त्याच्या दोन दिवस आधी मनमोहन यांच्यासाठी सोनियांनी डिनर पार्टी ठेवली आहे. निकालाच्या दुसर्या दिवशी म्हणजेच 17 मे रोजी पंतप्रधान आपल्या पदाचा राजीनामा देणार असून त्याआधी ते राष्ट्राला उद्देशून भाषणही करणार आहेत.
मनमोहन यांनी गेले दशकभर पंतप्रधानपदाची कमान सांभाळली.