Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नरेंद्र मोदी 'फेसबुक'वरही सुपरहीट !

नरेंद्र मोदी 'फेसबुक'वरही सुपरहीट !
वॉशिंग्टन , गुरूवार, 22 मे 2014 (18:02 IST)
भारताचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातच नव्हे तर विदेशातही प्रसिद्ध झाले आहेत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वा खाली भारतीय जनता पक्षाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकत एकहाती विजय मिळवला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर नरेंद्र मोदी हे सोशल नेटवर्किंग साइट 'फेसबुक'वर जगप्रसिद्ध झाले आहेत. मोदींच्या लाईक्स आणि शेअरिंग पाहाता मोदींनी जगात दुसर्‍या क्रमाकांचे राजकीय नेत्याचा बहुमान मिळवला आहे.

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 7 एप्रिल 2014 रोजी सुरु झाला. तेव्हा मोदींचे फेसबुकवर 12.46 कोटी फॅन्स होते. मात्र, नरेंद्र मोदींचे नाव भारताचे भावी पंतप्रधान म्हणून निश्चित झाल्यानंतर त्यांच्या फेसबुक फॅन्सची संख्या 15.245 कोटींवर पोहोचली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या फेसबुक फ्रेंड्‍सची संख्या 40 कोटी इतकी आहे. त्यानंतर आता मोदींचा क्रमांक लागतो. तिसर्‍या क्रमांकावर अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार मिट रोमनी हे आहेत. भारतातील निवडणुकीनंतर मोदींनी रोमनींना मागे टाकले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi