Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नितीन गडकरी भाजपचे पुन्हा पक्षाध्यक्ष?

नितीन गडकरी भाजपचे पुन्हा पक्षाध्यक्ष?
मुंबई , मंगळवार, 13 मे 2014 (14:21 IST)
भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना प्राप्तीकर विभागाने क्लिन चिट दिली आहे. त्यामुळे गडकर पुन्हा भाजपचा गड सांभाळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दीड वर्षापूर्वी आयकर विभागाच्या गडकरींशी संबंधित 'पूर्ती'वर धाडी पडल्याचे कारण देत गडकरींनी पक्षाध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर संघाने व भाजपने राजनाथ सिंह यांची निवड केली होती.

दरम्यान, जानेवारी 2013 मध्ये उत्तरेकडील नेत्यांनी गडकरींविरोधात मोर्चा खोलला होता. यात जेटलींसह अनेकांचा समावेश होता. त्यातच संघाचे वरिष्ठ नेते सुरेश सोनी यांनीही गडकरींच्याविरोधात भूमिका घेतल्यानंतर नागपूरातील संघ नेत्यांनी गडकरींना एक पाऊल मागे घेण्यास सांगितले आहे. आता सर्व काही सुरळीत होत असल्याचे लक्षात येताच नागपूरातील संघ नेते गडकरींना राजनाथसिंह यांच्याऐवजी पक्षाध्यक्षपदी बसविण्यास सज्ज झाले आहेत. राजनाथ सिंह यांना मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद देऊन त्यांची बोळवण करण्यात येणार आहे. तर गडकरी हे मोदींच्या मंत्रिमंडळात कोणतेही मंत्रिपद स्वीकारणार नाहीत. मात्र, नितीन गडकरींचा सकारात्मक व मृदू स्वभाव पाहता त्यांच्यावर एनडीएच्या संयोजकपदाची जबाबदारी सोपविण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोदींना पंतप्रधानपदी बसवून व गडकरींकडे पक्षाध्यक्षपद व संयोजकपद देऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याद्वारे संपूर्ण सरकार व पक्ष संघटना यावर नियंत्रण ठेवणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi