कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी(14 मे) रात्री पंतप्रधान मनमोहन सिंह यांना निरोप देण्यासाठी डिनरचे आयोजन केले होते. परंतु डिनरला कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीच दांडी मारल्याचे समजते. राहुल यांच्या अनुपस्थितीबाबत पक्षाच्या नेत्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहे.
पीएमओनुसार, राहुल गांधी यांनी गेल्या शनिवारीच मनमोहन यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे डिनरला आपण उपस्थिती देऊ शकणार नसल्याचेही राहुल यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. राहुल सध्या परदेशात असल्याचेही समजते. परंतु याबाबत दुजोरा मिळू शकला नाही.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसला विजय मिळेल, असा विश्वास सोनियांनी व्यक्त केला. एक्झिट पोलमध्ये पिछाडीवर पडूनही, धर्मनिरपेक्ष आघाडी मजबूत होईल, अशी आशा कॉंग्रेसला वाटत आहे.