16 लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला रविवारी निवडणूक आयोगाच्या चमूने पोलिसांसह भाजप कार्यालयावर धाडी घातल्या. यात टी-शर्ट्स व प्रचारसाहित्य जप्त करण्यात आले. मात्र, ते वितरीत करण्यात येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर लगेच ते परतही करण्यात आले. ते प्रचारसाहित्य वाटले जात नसल्याने आचारसंहितेचे उल्लंघन होत नव्हते, जिल्हा निवडणूक अधिकारी प्रांजल यादव यांच्या नेतृत्त्वात ही कारवाई करण्यात आली. एका सूचनेवरून धाड मारण्यात आल्याचे सेक्टर मॅजिस्ट्रेट लायक सिंह अत्रे यांनी सांगितले.
या कारवाईवर भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे सर्व साहित्य केंद्रीय कार्यालयाकडे पाठवले जात असल्याचे त्यांचे म्हणणे होते. कार्यकर्त्यांनी अधिकार्यांच्या वाहनांसमोर निदर्शने केली. आमचे कार्यकर्ते बाहेर पडू नये म्हणून दबाव आणण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप भाजप नेत्या मीनाक्षी लेखी यांनी केला.