निवडणुकीच्या निकालाच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजल्यापासून सुरूवात झाली असून भाजपाने प्रारंभीपासून आघाडी घेतली आहे.
देशातील प्रमूख शहरामध्ये भाजपाने आघाडी घेतली असून देशातील जवळपास ७१ जागेवर भाजपाला आघाडी मिळाली असून काँग्रेसला २४ तर इतर पक्षाला १३ जागेवर आघाडी मिळाली आहे. वाराणसीमधून नरेंद्र मोदी आघाडीवर आहे तर मैनपूरीमधून सपा नेते मुलायम सिंग यादव आघाडीवर आहे. पिलीभीतीमधून भाजपाच्या मनेका गांधी मात्र पिछाडीवर आहेत. आपचे योगेंद्र यादव हेही पिछाडीवर असल्याची माहिती मिळत आहेत.