भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्व पक्षांसाठी आपले दरवाजे खुले असल्याचे संकेत दिले. मात्र, त्यांच्यावर मायावती व ममता बॅनर्जींनी हल्लाबोल केला आहे.
कोणत्याही परिस्थितीत भाजपला पाठिंबा देणार नाही. बहुमत हुकण्याचे संकेत भाजपला मिळाल्यामुळे मोदी लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप बसपाच्या अध्यक्ष मायावती यांनी केला आहे.
दुसरीकडे, तृणमूलप्रमुख ममता बॅनर्जी यांनी भाजपला पाठिंबा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. ममता म्हणाल्या, 'बांगलादेशातून आलेल्या लोकांना परत पाठवण्याच्या वक्तव्याबद्दल मोदींने दोरखंडाने बांधून तुरुंगात पाठवले असते.