Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रातील कॉग्रेसचे दिग्गज पिछाडीवर...

महाराष्ट्रातील कॉग्रेसचे दिग्गज पिछाडीवर...
, शुक्रवार, 16 मे 2014 (11:42 IST)
पुण्यात भाजपाचे उमेदवार अनिल शिरोळे चौथ्या फेरीअखेर तब्बल 52 हजार मतांची आघाडी घेतली आहे. कॉंग्रसचे उमेदवार डॉ. विश्‍वजित कदम हे पिछाडीवर पडले आहेत. शिरोळे यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर आहेत. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच विजयी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्यातील उमेदवार दीपक पायगुडे यांच्या रुपाने तगडा उमेदवार उभा करून निवडून आल्यानंतर भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठींबा देणार असल्याचे जाहीर केले.
 
बारामतीत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे 13 हजार मतानी आघाडीवर आहेत. नांदेडमधून कॉंग्रेसचे अशोक चव्हाण आघाडीवर आहेत. बीडमध्ये भाजपचे गोपीनाथ मुंडे 60 हजार मतांनी आघाडीवर आहेत. नाशिकमध्ये भाजप आघाडीवर आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ तब्बल एक लाख मतांनी पिछाडीवर आहेत. सोलापुरात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिदें 50 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. अमरावतीत राष्‍ट्रवादीच्या नवनीत कौर पिछाडीवर आहेत. आनंदराव अडसूळ हे आघाडीवर आहेत. गोंदियात प्रफुल्ल पटेल 34 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. रत्नागिरी- सिंधुदुर्गमधून निलेश राणे पिछाडीवर आहेत

Share this Story:

Follow Webdunia marathi