लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. त्यासोबत रणनीतीसंदर्भातील बैठकाही सुरू झाल्या आहेत. गुजरातमधील गांधीनगरमध्ये नरेंद्र मोदींना भेटणार्यांची गर्दी होत आहे. भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह व लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा यांनी त्यांची भेट घेतली.
गांधीनगरमध्ये पी. ए. संगमांनी मोदींची भेट घेतल्यानंतर सांगितले, की मी भविष्यातील पंतप्रधानांना भेटून आलोय. अरुणाचलमधील दोन्ही जागा भाजपला मिळणार आहेत.