Publish Date: Mon, 28 Apr 2014 (10:39 IST)
Updated Date: Mon, 28 Apr 2014 (10:42 IST)
अहमदनगर जिल्ह्यातील हिरडगाव येथे मतदारांनी उत्साहात मतदान केले. श्रीगोंद्यातील हिरडगावात 64 टक्के मतदान झाले. मात्र, मुंबईत निरुत्साह दिसून आला. राज्यातील चारही मतदान केंद्रावर या आधी मतदानादरम्यान कर्मचार्यांच्या काही तांत्रिक चुकांमुळे फेरमतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता.
मुंबईतील दोन मतदारसंघातील तीन केंद्रांवर फेरमतदान झाले. उत्तर- मध्य मुंबईत 56 टक्के, उत्तर मुंबईत 58 टक्के तर मालाडमध्ये फक्त 34 टक्के मतदान झाले.