काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची प्रशंसा केली आहे. मोदींचे विधानसभेत आगमन झाल्यानंतर शंकरसिंह वाघेला यांनी त्यांची गळाभेट घेतली. वाघेला यांनी मोदींसमोर काही आव्हानेही ठेवली आहेत, अयोध्येत राम मंदिर उभारण्याबरोबरच कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पकडून भारतात आणण्याची मागणी वाघेलांनी केली आहे. याशिवाय गुजरात दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदींना क्लिनचिट दिली आहे.
वाघेला म्हणाले, श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी जे स्वप्न पाहिले होते, ते मोदींनी पूर्ण केले आहे. भाजपला सत्ता मिळवून देण्यामध्ये मोदींची मोठी भूमिका आहे. नरेंद्र मोदींकडे आता बहुमत आहे. यापार्श्वभूमीवर अयोध्येत राम मंदिर उभारा तसेच काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन करायला हवे. गुजरातच्या मुख्यमंत्री असताना गुजरातवर अन्याय होत असल्याचा आरोप केंद्र सरकार सतत करत होता.
सन 1984 मध्ये भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. मात्र, मोदींच्या नेतृत्वाखाली आज 282 जागा मिळाल्या आहेत, याचे श्रेय केवळ मोदींना जात असल्याचेही वाघेला म्हणाले.