कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शनिवार) वाराणसीतून भव्य रोड शो करून प्रचाराच्या शेवटच्या देवशी आपली ताकद दाखवली. काँग्रेस उमेदवार अजय राय यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी वाराणसीत शक्तिप्रदर्शन केले. राहुल गांधींच्या रोड शोला काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
दुसरीकडे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या वाराणसीमधील रोड शोवरून आता राजकारण सुरू झाले आहे. आज राहुल गांधींना रोड शो आणि सभेसाठी परवानगी मिळते मात्र नरेंद्र मोदींना गुरुवारी बेनियागंजमध्ये सभा घेण्यास परवानगी का नाकारण्यात आली होती? असा प्रश्न भाजप नेते अरुण जेटली यांनी केला आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या रोड शो आणि सभेला होणारी गर्दी ही वाराणसीतील असून बाहेरुन आणलेली गर्दी नसल्याचा दावा अभिनेते आणि काँग्रेस नेते राज बब्बर यांनी केला आहे.