Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लोकसभा 2014 निवडणूक निकाल मराठी वेबदुनिया वर

लोकसभा 2014 निवडणूक निकाल मराठी वेबदुनिया वर
, मंगळवार, 13 मे 2014 (15:48 IST)
भारतातील लोकशाहीचे सर्वात मोठे महायज्ञ 'लोकसभा निवडणूक 2014'ची पूर्णाहुती 16 मे रोजी मतमोजणी बरोबरच होईल आणि त्यासोबतच 16व्या लोकसभेचे चित्र पूर्णपणे स्वच्छ होणार आहे. यंदाची लोकसभा निवडणूक गेल्या अनेक निवडणुकांपेक्षा अनेकार्थांनी वेगळी होती. देशाच्या राजकारणाला वेगळे वळण देण्याची शक्यता या निवडणुकीने निर्माण केली. त्यामुळेच निकालांविषयी भारतातच नव्हे, तर जगभरात उत्सुकता आहे. देशाची सत्ता अशा काँग्रेसप्रणित सेक्युलर आघाडीच्या हातातून, भाजपप्रणीत आघाडीच्या नव्हे, तर मोदी या विकासाचा "मुखवटा' धारण करतानाच, सर्व आयुधे वापरून त्याआधारे राजकारण करू पाहणाऱ्या नेत्याच्या हाती जाणार काय, हा या निवडणुकीतील एकमात्र कळीचा प्रश्न बनला आहे. 

16 मे’च्या मतमोजणीसाठी प्रत्येक व्यक्ती उत्साहित आहे. मग तो गावातील एखादा शेतकरी असो किंवा शहरातील उद्योगपती. तुमच्या या सर्व उत्सुकतेला बघता आम्ही 'मराठी वेबदुनिया'वर मतमोजणी आणि 16व्या लोकसभेशी निगडित लहान मोठ्या सर्व प्रकारच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही तयार आहोत.  

आम्ही इलेक्शन कवरेजमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कुठल्या पक्षाची युती आघाडी वर आहे किंवा देशभरातून निवडणूक लढणारे दिग्गज मतदानाच्या रिंगणात मात खात आहे किंवा विजयाचा बिगूल वाजवणार आहे. ...आणि हो, लाइव्ह कमेंट्री आणि लाइव्ह निवडणूक परिणामाच्या क्षणा क्षणाची माहिती देण्याचाही प्रयत्न आम्ही करत आहे.

निवडणुकांत राज्यवार पक्षांची स्थिती काय आहे याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देऊ. तसेच मराठी वेबदुनियावर  लोकसभेच्या एकूण 542 जागांसाठी होणा-या मतदानासाठी विविध पक्षांचे आणि अपक्ष असे हजारो उमेदवारांची स्थिती देखील तुम्हाला मिळेल.  

लोकसभा निवडणुकी शिवाय अधिक काही वेबदुनियावर बघता येईल. आता फक्त 16 'मे'ची वाट बघा. आम्ही तयार आहे, काय तुम्हीपण तयार आहे ?  वाचत राहा -  http://elections.webdunia.com/

Share this Story:

Follow Webdunia marathi