जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे पाहिले जाते. सोळाव्या लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. देशभरात लोकसभेच्या एकूण 542 जागांसाठी होणा-या मतदानसाठी विविध पक्षांचे आणि अपक्ष असे हजारो उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्या सर्वांचा लेखाजोखा ठेवणे तसे कठीणच. उत्तर प्रदेश पाठोपाठ लोकसभेत सर्वाधिक खासदार पाठवणा-या महाराष्ट्रातच 48 मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातून कोणते महत्त्वाचे उमेदवार जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी रिंगणात उतरले आहेत. आपल्या मतदारसंघातील उमेदवारांबाबत गोंधळ उडू नये, यासाठी 'लोकसत्ता' संकेतस्थळाने तयार केलेली ही यादी.