राज्यात सहा पक्षांची महायुती तयार झाली आहे. त्यात सातवा 'भिडू' अर्थात पक्ष नसेल, असे पुनरुच्चार भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी शिर्डीत केला. रविवारी मुंडे यांनी शिर्डीत साईबाबांचे सपत्नीक दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुंडे म्हणाले, मनसेला विधानसभा निवडणुकीत सोबत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी येत्या 14 मे रोजी राज्यातील राज्यातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकार्यांची मुंबईत बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात आपण 40 मतदारसंघात सभा घेतल्या. त्यापैकी किमान 35 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील. देशात भाजपला 235 तर एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार आहे. आपल्याला कोणतीही महत्त्वाकांक्षा नसून कॉँग्रेसचा पराभव करणे एवढीच एकमेव महत्त्वाकांक्षा होती. नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील आणि ते देतील ती जबाबदारी आपण घेणार आहोत. राज्याला गरज वाटेल तेव्हा आपण राज्यात येऊ, असेही त्यांनी सांगितले.